Earthquake. (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai)  शहरामध्ये आज (17 जून) सकाळी 11 वाजून 51 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. National Center for Seismology च्या माहितीनुसार, हा भूकंपाचा धक्का 2.5 मॅग्निट्युडचा होता. तर मुंबईपासून उत्तर दिशेला 103 किमी पर्यंत दूर होता. मागील काही दिवसात उत्तर भारतामध्ये दिल्ली, जम्मू कश्मिर प्रमाणेच गुजरात भागात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

दक्षिण गुजरातमध्ये राजकोटमध्ये सोमवारी 4.4 मॅग्निट्युटचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. तर मागील 24 तासात दुसर्‍यांदा हा भाग हादरल्याचं वृत्त आहे. तर रविवारी कच्छ परिसरातही रात्री 8 वाजून 13 मिनिटांनि 5.5 मॅग्निट्युटचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. Earthquake in Delhi-NCR: दिल्ली-एनसीआर परिसरात दीड महिन्यात 11 वेळा भूकंप, मोठ्या आपत्तीचे संकेत.

ANI Tweet

उत्तर भारतामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहे. जम्मू कश्मिरमध्ये काल सकाळी 5.8 मॅग्निट्युडचा धक्का जाणवला होता. हा तीन दिवसातील तिसरा धक्का होता. मात्र सुदैवाची बाब म्हणजे या काळात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 7च्या सुमारास आलेल्या भूकंपाच्या धक्क्यामध्ये Tajikistan या भागामध्ये भूकंपाचे केंद्र होते अशी माहिती दिली जात आहे.