मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील (Nair Hospital) शिकाऊ डॉक्टर पायल तडवीच्या (Payal Tadvi) आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली होती. हॉस्पिटलमधील सिनियर महिला डॉक्टर्सकडून सातत्याने जातीवरुन बोलणी ऐकावी लागत असल्याने पायलने गळफास घेत 22 मे रोजी आपले जीवन संपवले. या प्रकरणी तीन सिनियर डॉक्टर्संना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सुरु असलेल्या पुढील तपासाला यश आले असून पायल तडवीने लिहिलेली सुसाईट नोट 3 आरोपींनी नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र या सुसाईट नोटचा स्क्रिनशॉट फोनमधून रिकव्हर करण्यात फॉरेंसिक विभागाला यश आले आहे, अशी माहिती वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.
त्याचबरोबर या सुसाईट नोटमध्ये जातीवरुन शेरेबाजी करत असल्याचा उल्लेख केला असून या प्रकरणातील आरोपी सिनियर डॉक्टर्सची नावांचाही खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारत दंड संहितेच्या कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात केला आहे. (पायल तडवी कथित आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपी सिनियर डॉक्टर्सचा जामीन फेटाळला)
ANI ट्विट:
Advocate Gunaratna Sadavarte: The suicide note not only mentions about the casteist abuses but also names the three senior women doctors arrested in the case. Police have initiated action under section 201 (destruction of evidence) of India Penal Code. (July 5) #Maharashtra https://t.co/K3VuerIxEQ
— ANI (@ANI) July 5, 2019
डॉ. पायल तडवी आत्महत्ये प्रकरणी डॉ. भक्ती मेहेर (Bhakti Mehre), डॉ हेमा अहुजा (Hema Ahuja) आणि डॉ अंकिता खंडेलवाल (Ankita Khandelwal) या तीन सिनियर डॉक्टर्संना अटक करण्यात आली होती.