Payal Tadvi (Photo Credits: Facebook)

मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील (Nair Hospital) शिकाऊ डॉक्टर पायल तडवीच्या (Payal Tadvi ) आत्महत्या आणि रॅगिंग प्रकरणी आरोपी भक्ती मेहेर (Bhakti Mehre), डॉ हेमा अहुजा (Hema Ahuja) आणि डॉ अंकिता खंडेलवाल (Ankita Khandelwal) यांचे जामीन अर्ज विशेष एस-एसटी कोर्टाने फेटाळले. मुंबईत याप्रकरणी आज सुनावणी करण्यात आली. 28 मे रोजी या तिन्ही सिनियर डॉक्टर्सना अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिस गुन्हे शाखा करणार डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास

ANI Tweet

पायलला सतत जातीवाचक शेरेबाजी करून मानसिक त्रास दिला जात होता, तिच्या तक्रारीची दखल न घेतल्याने अखेर पायलने गळफास घेऊस आयुष्य संपवले असा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. सध्या डॉ. पायल तडवीचं कथित आत्महत्या प्रकरण मुंबई पोलिस गुन्हे शाखा विभागाकडे देण्यात आलं आहे.

तडवी कुटुंबीयांनी मीडियाशी बोलताना नायर हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली होती. सिनियर डॉक्टरांच्या छळाला कंटाळून पायलने 22 मे दिवशी वसतीगृहामध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.