डॉ. गेल ओमवेट यांचे निधन (Gail Omvedt Passes Away) झाले आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर संघटनेचे डॉ. भारत पाटणकर (Bharat Patankar) यांच्या त्या पत्नी होत. समाजशास्त्रज्ञ, विचारवंत लेखीका आणि सामाजिक कार्यकर्त्या अशी बहुआयामी ओळख असलेल्या गेल ओमवेट ((Gail Omvedt) यांचे निधन झाल्याने सामाजिक चळवळींमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दुख:ची लाट निर्माण झाली आहे. डॉ. गेल ओमवेट या जन्माने मूळच्या अमेरिकन होत्या. अमेरिकेतील साम्राज्यवादाला त्यांनी विरोध केला. महात्मा फुले यांच्या चळवळीवर त्यांनी 'साम्राज्यवादी व्यवस्थेथील सांस्कृतीक बंड' या विषयावर प्रबंध लिहिला. जो जगभरात गाजला.
गेल ओमवेट या जन्माने अमेरिकन असल्या तरी त्यांनी भारतात राहणे पसंत केले. जन्माने अमेरिकन असूनही त्यांनी भारत आणि भारतीयत्व मनापासून स्वीकारले होते. त्या पूर्णपणे भारतीयच होऊन गेल्या होत्या. डॉ. गेल ओमवेट यांचा जन्म मिनियापोलिस (Minneapolis) येथे झाला त्यांचे शिक्षण कार्लटन कॉलेज (Carleton College) आणि यूसी बर्कले (UC Berkeley) येथे शिक्षण घेतले. इथेच 1973 मध्ये त्यांनी समाजशास्त्रात पीएचडी मिळवली. दरम्यान, डॉ. भारत पाटणकर यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला. त्यानंतर 1983 पासून त्या भारतीय नागरिक आहेत. (हेही वाचा, Chetan Chauhan Passes Away: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचे निधन)
डॉ. गेल ओमवेट या पाठीमागील अनेक वर्षांपासून पती, भारत पाटणकर, सासू इंदुमती पाटणकर आणि चुलत भाऊ यांच्यासोबत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कासेगाव नावाच्या खेडेगावात राहात होत्या.
त्यांनी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP), ऑक्सफॅम नोविब (NOVIB) आणि इतर संस्थांसाठी समनाता, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या विषयांवर सल्लागार समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करत होत्या. त्यांनी यूएन एजन्सी आणि एनजीओसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. तसेच ओरिसातील NISWASS मध्ये डॉ.आंबेडकर चेअर प्रोफेसर, पुणे विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्राध्यापक, नॉर्डिक इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज, कोपेनहेगन येथे आशियाई अतिथी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी, नवी दिल्ली येथे एक वरिष्ठ फेलो म्हणूनही त्या कार्यरत होत्या.