महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आल्याने लॉकडाउन (Lockdown) सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नव्हेतर, पुढील 8 दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर, लॉकडाऊनचा निर्णय घेण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही नागरिकांना संकेत दिले आहेत. यातच लॉकडाऊनबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्वाची घोषणा केली आहे. कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका! हेच मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचे आहे, असा निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजना भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अजित पवार म्हणाले की, "महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. लॉकडाऊन केल्यानंतर संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था विस्कटून जाते, हे सर्वांनीच पाहिले आहे. हातावर पोट भरणाऱ्यांना नागरिकांनाची अवस्था बिकट होते. परंतु, अनलॉकनंतर नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका, हेच मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचे आहे", असा निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. हे देखील वाचा- CM Uddhav Thackeray Appeals: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवाहनानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी रद्द केले नियोजित दौरे
महाराष्ट्रात रविवारी (21 फेब्रुवारी) 6 हजार 971 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, नव्या 2 हजार 417 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 19 लाख 94 हजार 947 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 52 हजार 956 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे.