शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांत विरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या विरोधात मुंबई पोलिसांत (Mumbai Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या अज्ञातवासात गेल्याची चर्चा आहे. तसेच सोमय्या यांनी एक व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात राज्य सरकारला आव्हान दिलं आहे. डिसेंबर 2013 मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने 'विक्रांत' ही युद्धनौका 60 कोटी रुपयांना सफाई कामगारांना विक्रीसाठी आणली होती. त्यामुळे आम्ही याला विरोध केला आणि प्रतिकात्मक रक्कम उभारण्याचा निर्णय घेतला.
मात्र आता 10 वर्षांनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपल्या मुलाच्या कंपनीतून 58 कोटी रुपयांची चोरी आणि पैसे लाँडर केल्याचा आरोप करत आहेत. संजय राऊत यांनी गेल्या दोन महिन्यांत माझ्यावर सात वेगवेगळे आरो5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87+%3F&via=LatestLYMarathi', 650, 420);">