Coronavirus Cases In Dharavi: धारावीत (Dharavi) आज 11 नवे कोरोना बाधित रुग्ण (Corona Positive Patient) आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2334 वर पोहचला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण हे मुंबई शहरात आढळून येत आहेत. आज मुंबईत दिवसभरात 1 हजार 201 नव्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच 39 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - जालना जिल्ह्यात आज 56 नवे कोरोनाबाधित रुग्ण; कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून पुढील 10 दिवस कडक संचारबंदी लागू)
Dharavi slum sprawl in Mumbai reports 11 new COVID-19 cases, taking tally to 2,334: Brihanmumbai Municipal Corporation
— Press Trust of India (@PTI_News) July 6, 2020
दरम्यान, आज राज्यात 5,368 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची (Corona Positive Patients) नोंद करण्यात आली आहे. तसेच 204 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2,11,987 इतकी झाली आहे. आतापर्यंत राज्यात कोरोना व्हायरसमुळे 9,026 जणांचा बळी गेला आहे. याशिवाय सध्या राज्यात 87,681 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.