Chief Minister Uddhav Thackeray

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक वाढत आहे. तर राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. परंतु मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत मात्र कोरोनाची परिस्थिती सुधारत चालल्याचे दिसून येत आहे. तर आज धारावीत कोरोनाचे नवे 11 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2370 वर पोहचला आहे. तर धारावी मधील कोरोनाच्या परिस्थिती बाबत एकूणच बोलायचे झाल्यास परिस्थिती हळूहळू पुर्ववत होत असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा धारावीतील कोरोनाच्या परिस्थितीबाबत कौतुक केले आहे. उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले आहे की, धारावीतील कोरोनाच्या परिस्थितीवर मिळवलेले नियंत्रण हे जगासाठी प्रेरणादायक आहे.

उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, आशियातील सर्वात मोठ्या आणि दाटीवाटीची लोकवस्ती असलेल्या धारावीने कोरोनावर नियंत्रण कसे मिळवावे आणि त्याच्या विरोधात कसे लढावे हे जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे हे धारावी हे जगासाठी रोलमॉडेल ठरले असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.(Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची मनपा व जिल्हानिहाय आकडेवारी जाणून घ्या एका क्लिक वर)

धारावीत सध्या 122 अॅक्टीव्ह रुग्ण असून 2002 जणांची प्रकृती सुधारल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा आकड्यात घट होताना दिसून येत आहे. तरीही महापालिकेकडून या ठिकाणी वारंवार निर्जंतुकीकरणासह नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे.(WHO ने घेतली धारावीत कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याची दखल; आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मानले धारावीकरांचे आभार)

दरम्यान महाराष्ट्रातील एकूणच कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास आकडा 820916 वर पोहचला असून 22123 जणांचा बळी गेला आहे. तर राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार नियमात शिथीलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून पुन्हा लॉकडाऊनचे आदेश जाहीर केले आहेत.