प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांच्या संख्येत काल,  10 जुलै रोजी 7862 नव्या रुग्णांची वाढ झाली. यानुसार सध्या राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,38,461 इतकी झाली आहे. कालच्या दिवसभरात 226 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंतची एकूण आकडेवारी पाहिल्यास कोरोनामुळे राज्यात 9,893 रुग्णाचा बळी गेला आहे, दुसरीकडे, काल 5366 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले, ज्यासहित आतापर्यंत 1, 32,625 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.15 टक्के एवढा आहे.  राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 55.62 टक्के आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा आता 1 लाखाच्या घरात पोहचण्याच्या मार्गावर आहे. तर ठाणे (Thane), पुणे (Pune) ,कल्याण- डोंबिवली (Kalyan- Dombivli), नाशिक (Nashik), नागपूर (Nagpur), औरंगाबाद (Aurangabad)  या भागात सुद्धा कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.

राज्यात तुम्ही राहत असणाऱ्या विभागात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी पहा. कोरोनामुक्त मुंबईसाठी स्वयंसेवी संस्थांनी शहरातील झोपडपट्टयांमध्ये वॉर्डनिहाय पथक स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा आणि मनपा निहाय आकडेवारी (11 जुलै)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 90,461 5205
2 ठाणे 7666 148
3 ठाणे मनपा 13,837 524
4 नवी मुंबई मनपा 10,260 270
5 कल्याण डोंबिवली मनपा 13,192 189
6 उल्हासनगर मनपा 3785 65
7 भिवंडी निजामपूर मनपा 2832 157
8 मीरा भाईंदर 5566 183
9 पालघर 1727 21
10 वसई विरार मनपा 7236 150
11 रायगड 3734 59
12 पनवेल मनपा 3879 92
ठाणे मंडळ एकूण 1,64,175 7063
1 नाशिक 1492 66
2 नाशिक मनपा 3925 121
3 मालेगाव मनपा 1168 82
4 अहमदनगर 441 18
5 अहमदनगर मनपा 262 2
6 धुळे 739 41
7 धुळे मनपा 684 32
8 जळगाव 4033 265
9 जळगाव मनपा 1227 61
10 नंदुरबार 240 11
नाशिक मंडळ एकूण 14,211 699
1 पुणे 3125 94
2 पुणे मनपा 26,857 835
3 पिंपरी-चिंचवड मनपा 5250 97
4 सोलापूर 587 34
5 सोलापूर मनपा 3008 300
6 सातारा 1585 64
पुणे मंडळ एकुण 40,412 1424
1 कोल्हापूर 985 17
2 कोल्हापूर मनपा 77 0
3 सांगली 471 11
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 79 3
5 सिंधुदुर्ग 254 5
6 रत्नागिरी 832 29
कोल्हापूर मंडळ एकुण 2698 65
1 औरंगाबाद 1724 35
2 औरंगाबाद मनप 5967 288
3 जालना 880 36
4 हिंगोली 325 2
5 परभणी 94 5
6 परभणी मनपा 86 0
औरंगाबाद मंडळ एकूण 9076 366
1 लातूर 374 22
2 लातूर मनपा 232 7
3 उस्मानाबाद 332 14
4 बीड 191 4
5 नांदेड 155 4
6 नांदेड मनपा 374 15
लातूर मंडळ एकूण 1658 66
1 अकोला 311 21
2 अकोला मनपा 1485 70
3 अमरावती 99 7
4 अमवरावती मनपा 697 27
5 यवतमाळ 402 14
6 बुलढाणा 379 16
7 वाशीम 157 4
अकोला मंडळ एकूण 3530 159
1 नागपूर 261 3
2 नागपूर मनपा 1649 16
3 वर्धा 28 1
4 भंडारा 148 0
5 गोंदिया 199 2
6 चंद्रपूर 110 0
7 चंद्रपूर मनपा 35 0
8 गडचिरोली 96 1
नागपूर मंडळ एकूण 2526 23
इतर राज्य 175 28
एकूण 2,38,461  9893

 

दरम्यान, काल जागतिक आरोग्य संघटनेकडून मुंबईतील कोरोनाचा हॉस्पॉट ठरलेल्या धारावीच्या विशेष कौतुक करण्यात आले. कोरोनाची इतकी मोठी साखळी तोडून धारावी आता संपूर्णतः कोरोनमुक्त होण्याच्या मार्गवर आहे.

दुसरीकडे, पुणे, ठाणे, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली हे आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट ठरत आहेत. याच पार्श्वभूमीवर या जिल्हा व मनपा विभागात पुढील आठवड्यात संपूर्ण लॉक डाऊन पाळण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.