Coronavirus in India (Photo Credits: IANS)

मुंबई (Mumbai) मध्ये आज 1,354 कोरोना विषाणू (Coronavirus) बाधित रुग्णांची नोंद व 73 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज शहरामधून 2,183 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यासह मुंबईमधील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 90,149 वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरामधून 61,934 लोक बरे झाले आहेत व आतापर्यंत 5,202 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरामध्ये 22,738 सक्रीय रुग्ण आहेत. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली. आज शहरामध्ये 905 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे.

आजच्या मृत झालेल्यापैकी 58 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 53 रुग्ण पुरुष व 20 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 2 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 55 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 16 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 68 टक्के असून, 03 जुलै ते 09 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.41 टक्के आहे. 9 जुलै 2020 पर्यंत झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 3,79, 554 इतक्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुष्पटीचा दर 49 दिवस आहे. (हेही वाचा: देशातील विविध भागातून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध - उदय सामंत)

एएनआय ट्वीट -

सध्या शहरात सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) 751 इतक्या असून, सीलबंद इमारती 6597 आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आज 7862 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत व दिवसभरात 226 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 5366 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,38,461 इतकी झाली आहे.