Uday Samant | (File Photo)

देशातील वेगवेगळ्या भागातून गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोकणात (Konkan) येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध आहे, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आज उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीला स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उदय सामंत म्हणाले की, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात 14 दिवस ठेवण्यापेक्षा 7 दिवस ठेवणे, त्यांना कोकणात गणेशोत्सवासाठी येताना टोल माफ सुविधा देणे, त्यांच्या पासेसची व्यवस्था आणि प्रवासाचे नियोजन, तसेच त्यांची कोविड-19 ची तपासणी करणे आदी विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली, असंही उदय सामंत यांनी सांगितलं. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर! राज्यात आज 7862 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 226 जणांचा मृत्यू)

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची विशेष काळजी घेण्यात येईल. चाकरमान्यांनी गणपतीला आलेच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यांना कोकणात येण्यास विरोध नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेदेखील सामंत यांनी यावेळी सांगितलं. सरकारच्या या निर्णयामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला आहे.