Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस हजारो रुग्णांची वाढ होत आहे. महाराष्ट्रात आज 7862 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच दिवसभरात 226 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.15 टक्के एवढा आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आज 5366 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,38,461 इतकी झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात 9,893 रुग्णाचा बळी गेला आहे. तसेच 1 लाख 32 हजार 625 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 55.62 टक्के आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (Public Health Department) माहिती दिली आहे. (हेही वाचा - Lockdown In Kalyan-Dombivali: कल्याण-डोंबिवलीत येत्या 19 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार, KDMC महापालिकेचे आदेश)

सध्या राज्यात 95,647 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. दरम्यान, भारतात मागील 24 तासांत 26,506 नव्या रुग्णांची भर पडली. तर 475 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 93 हजार 802 वर पोहचला आहे. यातील 4,95,513 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 2,76,685 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.