मुंबई (Mumbai) येथील धारावी (Dharavi) परिसरात राहणाऱ्या एका विवाहीत महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पीडित महिला 19 वर्षे वयाची आहे. आरोपींनी आपली ओळख लपविण्यासाठी चेहरे कापडाने झाकले होते. आरोपींनी बलात्काराच्या घटनेचा व्हिडिओ शूट केल्याचाही पीडितेचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Poli) धारावी विभागाने ( (Dharavi police)) घटनेची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. दरम्यान पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
मुंबई पोलिसांकडून घटनेची तातडीने दखल घेऊन आरोपींचा शोध सुरु केला आहे. आरोपी गुन्हा घडलेल्या भागातीलच असावा असा संशय आहे. त्यानुसार पोलीस परिसरातील सीसीटीवही फुटेज तपासत असून आरोपींचा शोध घेत आहेत. दोन संशयितांना अटक करण्यात आली असल्याचेही मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. धारावी पोलिसांकडे या प्रकरणी 11 मे रोजीच तक्रार दाखल झाली होती. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्र हालवून दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे. या दोघांनी बलात्कार केल्याचा पोलिसांना संशय आहे. (हेही वाचा, Marital Rape: वैवाहिक बलात्कार गुन्हा आहे की नाही? कोर्टासमोर पेच)
#UPDATE Two arrested in connection with the alleged gangrape in of a 19-year-old married woman in Dharavi: Mumbai Police
— ANI (@ANI) May 16, 2022
अनिल जुगदेव चौहान (१९) , निलेश जुगदेव चौहान (२०) अशी धारावी सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी मुंबईतील विलेपार्लेच्या प्रेम नगर येथील रहिवासी असल्याचे समजते. घराचा दरवाजा उघडा ठेऊन पीडिता झोपली होती. याचाच फायदा घेऊन दोन आरोपींनी घरात प्रवेश मिळवला. ओरोपींनी तोंडाला मास्क लावल्याने पीडिता त्यांना ओळखू शकली नाही. दरम्यान, एक आरोपी बलात्कार करत असताना दुसरा त्याचे मोबाईलद्वारे व्हिडिओ शुटींग करत होता. दोन्ही आरोपी साधारण 30 ते 35 वर्षे वयाचे असावेत असा अंदाज पीडितेने वर्तवला होता. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376, 376 (ड), 425, 354 (ब), 354 (ड), 506 (2) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.