महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांचाही वाढदिवस 22 जुलै दिवशी म्हणजे उद्यावर येऊन ठेपला आहे. परंतू रायगड मधील इर्शाळवाडी भागात दरड कोसळल्याची घटना पहाता दोघांनीही संवेदनशीलता दाखवत त्यांच्या बर्थ डे सेलिब्रेशन टाळण्याचा निर्णय घेतला आहे. काल अजित पवारांपाठोपाठ आज देवेंद्र फडणवीसांकडूनही ही माहिती देण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला वाढदिवसा साजरा करण्यासाठी जाहिराती, बॅनर यावर पैसे न उधळता रायगड मधील दुर्घटनेसाठी निधी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. फडणवीस यांच्या वाढदिवशी भाजपचे नेते कार्यकर्ते लोकांना सेवा देणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही वाढदिवस साजरा करू नये, मोठी होर्डिंग लावू नयेत असे आदेश भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. नक्की वाचा: संकटात असणार्या शेतकरीच्या मागे उभं राहत कृषमंत्री Dhananjay Munde यांचा आज वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय .
महाराष्ट्र भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी भाजपा रुग्ण मित्र सेवा अभियान २२ जुलै २०२३ ते २२ जुलै २०२४ या कालावधीत राबविणार आहे. या अभियानाच्या प्रदेश प्रभारीपदी श्री रामेश्वर पूनमचंद नाईक यांची नियुक्ती केली.… pic.twitter.com/gR9VKAsRm7
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 21, 2023
महाराष्ट्रात सत्तासंघर्षादरम्यान आणि बदललेल्या राजकीय गणितांनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच एकत्र बर्थ डे होता. त्याच्या अनुषंगाने मोठ्या सेलिब्रेशनची देखील तयारी झाली होती पण आता ते रद्द होण्याची शक्यता आहे. काल महाराष्ट्र कॉंग्रेस ने टीका करत या बर्थ डे सेलिब्रेशनची आमंत्रण पत्रिका ट्वीट करत टीका केली होती.
सत्ताधाऱ्यांमध्ये जरा तरी संवेदना उरल्या आहेत का?
समृद्धी महामार्गावर अपघात होऊन कित्येक लोक मृत्यूमुखी पडलेले असताना हेच सत्ताधारी दुसऱ्याचा पक्ष फोडून शपथविधी करत होते आणि आता इरसाळवाडी येथे नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असताना हे वाढदिवसाच्या पार्ट्या करतायत.
शिंदे-फडणवीस-पवार… pic.twitter.com/fixg0259cG
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 20, 2023
दरम्यान इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये घरांवर दरड कोसळली असल्याने मोठं नुकसान झालं आहे. 16 जणांनी जीव गमावले आहे. यामध्ये एका एनडीआरएफ जवानाचा देखील मदतीसाठी जाताना कार्डिएअक अरेस्टने मृत्यू झाला आहे.