Ajit Pawar Birthday: इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा अजित पवार यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

अजित पवार यांनी आपला 22 जुलै दिवशी होणारं वाढदिवसाचं सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतला आहे. बुके, जाहिरातींवर खर्च न करता निधी इर्शाळवाडी पुन्हा उभारणीसाठी द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Ajit Pawar Birthday: इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा अजित पवार यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
Ajit Pawar | Twitter

रायगड मध्ये काल मध्यरात्री इर्शाळवाडी भागात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये काही कुटुंब दरडीच्या मलब्याखाली दबली गेली आहे. त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. महाराष्ट्र शासन सध्या मदतीला लागले आहे. अशात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला 22 जुलै दिवशी होणारं वाढदिवसाचं सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतला आहे. बुके, जाहिरातींवर खर्च न करता निधी इर्शाळवाडी पुन्हा उभारणीसाठी द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बर्थ डे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित उत्सव सप्ताह म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, पेरण्या झालेल्या नाहीत, त्यामुळं प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचे त्यांचे तेव्हा आवाहन होते. नक्की वाचा: संकटात असणा‍र्‍या शेतकरीच्या मागे उभं राहत कृषमंत्री Dhananjay Munde यांचा आज वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2023 01:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).