Sanjay Raut | (Photo Credits: Facebook)

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी 'इमोशनल ब्लॅकमेल' करत लोकांकडून आयएनएस विक्रांत (INS Vikrant) बचावसाठी पैशे गोळा केले. त्यांनी गोळा केलेल्या पैशांचा घोटाळा हा देशात घडलेल्या बोफोर्स, राफेल आणि ऑगस्ट वेस्टलँड पेक्षाही मोठा आहे. असे असताना नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असेलेले भाजपचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnis) हे किरीट सोमय्या यांची वकिली करतात ते पाहून आश्चर्य वाटले, अशी तोफ शिवसेना (Shiv Sen) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी डागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत पवार यांनी संजय राऊत यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले. याबद्दल संजय राऊत यांनी शरद पवार यांचे आभार मानले आहेत.

विरोधकांचा आवाज संसदेतही दडपला जातो आहे. विरोधकांना संसदेत बोलू दिले जात नाही. विरोधक जर बललेच तर त्यांचे म्हणने विधानसभच्या पटलावर (रेकॉर्डवर) घेतले जात नाही. हा मोठा अन्याय आहे, असे संजय राऊत म्हणाले. 'यहा डरना मना हैं' असे म्हणत संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले की, आमच्या विरोधात कितीही कारस्थाने केली, कुजबूज केली तरी आम्ही घाबरणार नाही. कुजूबज करण्यात त्यांचे आयुष्य गेले. आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. आम्ही लढत राऊ असेही राऊत यांनी म्हटले. (हेही वाचा, Sharad Pawar Press Conference: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली? शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितला तपशील)

केंद्रीय यंत्रणांच्या कारावाईला मी आणि आम्ही सर्वजण सामोरे जातो आहोत. माझ्यावर झालेल्या कारवाईमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार अस्वस्थ आहेत. त्यांचा मला वारंवार फोन येतो आहे. आज मला प्रियंका गांधी यांचाही फोन आला होता. देशभरातील अनेक प्रमुख नेत्यांनी माझ्याबद्दल आस्था व्यक्त केली आहे. मी लढत राहीन. शरद पवार हे महाराष्ट्र आणि देशातील टोलेजंग नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्याने पंतप्रधानांसमोर माझा विषय काढावा याबद्दल मी त्यांचा आभारी आहे

संजय राऊत एकटेच लढतात. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबद्दल काहीच बोलत नाहीत, असा सवाल प्रसारमाध्यमांनी केला. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. मी शिवसेना नेता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संपूर्ण ठाकरे परिवार आणि अवघी शिवसेना देशभरातील अनेक विरोधी पक्षाचे नेते माझ्या पाठीशी आहेत. माझ्या सहकाऱ्यांनी यात पडू नये असे मला वाटते. ही लढाई आहे आणि आम्ही ती लढू, असे राऊत म्हणाले.