Devendra Fadnavis Visit at Rain Affected Districts: देवेंद्र फडणवीस राज्यातील अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा येत्या 19 ऑक्टोंबर पासून करणार
Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र राज्यातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. तसेच काही ठिकाणी पूर परिस्थिती सुद्धा उद्भवली आहे. याच कारणास्तव आता राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडवणीस येत्या 19 ऑक्टोंबर पासून अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाणार आहे. तर अतिवृष्टीमुळे पुण्यात जवळजवळ 48 जणांचा बळी गेला आहे. त्याचसोबत औरंगाबाद आणि कोकण भागात गेल्या तीन दिवसात शेती आणि लाखो रुपयांचे नागरिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे.(Maharashtra Rains: अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा; वायूसेना, नौदल, लष्कर यांना हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना)

प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, फडणवीस त्यांचा दौरा बारामती येथून सुरु करणार आहेत. अशा पद्धतीने एकूण 9 जिल्ह्यांना देवेंद्र फडवणीस भेट देणार आहेत. त्यात पुणे, सोलापूर आणि उस्मानाबाद यांचा सुद्धा समावेश आहे. दौऱ्यामागील मुख्य कारण म्हणजे अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल आणि शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान यासाठीच फडणवीस अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांना भेट देणार आहेत.(Maharashtra Rains Update: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; पाहा पाच महत्त्वाच्या बातम्या)

दरम्यान, राज्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे पुराची परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणाहून आतापर्यंत  29 हजारांपेक्षा अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर पुर आणि भुस्खलनामुळे जवळजवळ 2 हजारांहून अधिक घरांचे नुकसान ही झाले आहे. सध्या विविध राज्यातील जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आहे. तर सरकारकडून जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच कारणास्तव विविध परिसरात एनडीआरएफच्या तुकड्या ही तैनात केल्या गेल्या आहेत.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. पुर परस्थिती निर्माण झाल्याने 57345 हेक्टर शेतजमिनीवरील शेतीचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लाग आहे. यामध्ये मुख्यत्वे द्राक्ष, उस आणि सोयाबीनच्या उत्पादनाला फार मोठा फटका बसला आहे. सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकनभरपाई बद्दल विचार करत आहेत. तसेच याबद्दल लवकरच सरकारकडून घोषणा सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे.