Devendra Fadanvis (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रात आता सीमावादाचा प्रश्न पुन्हा चर्चेमध्ये आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगलीमधील जत गाव कर्नाटकामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या विचारात असल्याचं वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. सत्ताधारी, विरोधक यावरून आपली मतं जाहीर करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडीयाला प्रतिक्रिया देताना, ' महाराष्ट्रातून एकही गाव कर्नाटक मध्ये जाणार नाही. बेळगाव, निपाणी सह गेलेली गावं देखील पुन्हा महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान जत जावाचा ठराव देखील जुना आहे. त्यांच्या पाणी प्रश्नासाठी सरकारची पाणीयोजना तयार आहे. त्याची अंमलबजावणी कोविड दरम्यान सरकारला करणं शक्य नव्हते. पण लवकरच त्यांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.

पहाट्वीट

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद सध्या कोर्टात आहे. तेथेही महाराष्ट्राची बाजू ठामपणे मांडण्यासाठी वकिलांची फौज तयार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.  आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये सीमावाद प्रकरणी सुनावणी आहे. शिंदे फडणवीस सरकार मध्ये चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई यांच्यावर समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे.