राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था हटविली
Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्ली मधील सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे. तर 20 जानेवारी पासून ही सुरक्षा हटवली असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार यांच्या दिल्लीमधील घरात तीन गार्ड होते मात्र त्यांनी गेल्या काही दिवसांपासून कामावर आलेच नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने सूड घेतल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

राज्यात शरद पवार यांना झेड सिक्युरिटी पुरवली जाते. मात्र आता दिल्ली येथील शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. तर राज्यात सत्ताबदलानंतर हा प्रकार घडल्याने आता शरद पवार यावर काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. तर या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, सुरक्षा व्यवस्था काढल्याचा परिणाम शरद पवार यांच्यावर होणार नाही.(राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था हटविली; 24 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

तर भाजप सरकराच्या दरम्यान राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याचा प्रकार सुद्धा समोर आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार यांचे फोन टॅप झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी राज्य सरकारने महाराष्ट्र सायबर सेलला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत असे म्हटले आहे की, कायद्याच्या बाहेर जाऊन फोन टॅप केले जात नाही. पण आता भाजप सरकारवर फोन टॅपिंगचा आरोप लावण्यात आला आहे तो त्यांनी फेटाळून लावला आहे. एवढेच नाही तर भाजपच नव्हे तर शिवसेना सुद्धा सत्तेत असल्याचे विधान त्यांनी केले आहे.