High Tide in Mumbai | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्यामुळे पश्चिम किनार्‍यावर वायू चक्रीवादळाचा धोका आहे. मुंबईसह महाराष्ट्राला या चक्रीवादळाचा धोका नसला तरीही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. सध्या गुजरात राज्याकडे हे चक्रीवादळ सरकत असलं तरीही त्याचे परिणाम महाराष्ट्रावरही होत आहे. सध्या सतर्कतेचा इशारा म्हणून महाराष्ट्रातील किनारे पर्यटकांसाठी पुढील 24-48 तास बंद ठेवण्यात आले आहे.  जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता

ANI Tweet

महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वायू चक्रीवादळच्या प्रभावा दरम्यान 12 आणि 13 जून दिवशी भरतीचा धोका लक्षात घेता कोकण, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील समुद्र किनारे पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सध्या उन्हाळी सुट्टीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. अनेक नागरिक सध्या पावसाचा, रम्य निसर्गाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. परंतू मान्सूनपूर्व यंडा चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाल्याने समुद्र किनार्‍यांपासून पर्यटकांसह मच्छिमार्‍यांनी दूर राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.