High Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता
High Tide in Mumbai | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

Mumbai Monsoon 2019 High Tide: यंदा भारतामध्ये समाधानकारक आणि योग्य वेळेत मान्सून दाखल होणार असा अंदाज काही दिवसांपूर्वी स्कायमेटने व्यक्त केला होता. त्यानंतर जून ते सप्टेंबर 2019 या काळात महाराष्ट्रामध्ये 28 दिवस भरतीच्या (High Tide) लाटा 4.5 मीटरच्या वर जाण्याची शक्यता असल्याचा भारताच्या वेधशाळेने (India Meteorological Department) हा अंदाज व्यक्त केला आहे. मागील मान्सूनमध्ये (Monsoon) हे भरतीचे दिवस केवळ 24 होते. शेतकऱ्यांना मोठा दिलासा; यावर्षी समाधानकारक पाऊस, भारतीय हवामान खात्याचा अंदाज

मुंबईमध्ये पाऊस पडल्यानंतर भरतीच्यावेळेस पाणी साचून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे यंदा एनडीआरएफ आणि अग्निशामन दलाच्या अधिकार्‍यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहरातील वरळी, जुहू, वांद्रे, दादर, मरीन लाईन्स अशा भागातील समुद्र किनार्‍यावरही मोठ्या प्रमाणात कचरा किनार्‍यावर येतो.

यंदा 1 सप्टेंबर दिवशी सर्वात मोठी भरती येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही भरती 4.91 मीटरची असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.