Cyclone Tauktae Update: मुंबईच्या उंबरठ्यावर आज तौक्ते चक्रीवादळ; प्रशासन अलर्ट मोड वर
Cyclone | Representational Image (Photo Credits: PTI)

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंघावणारं Tauktae चक्रीवादळ आज मुंबईच्या (Mumbai) उंबरठ्यावर आहे. काल संध्याकाळपासूनच मुंबई आणि नजिकच्या परिसरामध्ये पाऊस, वारा सुरू झाला आहे. आज मुंबई मध्ये 'ऑरेंज अलर्ट'(Orange Alert) जारी करण्यात आला आहे.यामध्ये नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने संबंधित यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नेव्ही (Navy)  सह एनडीआरएफच्या (NDRF Team) टीम देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहे. दरम्यान हे तौक्ते चक्रीवादळ येत्या काही काळात अजून वेगवान होणार असल्याने गुजरात आणि दीव भागाला रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

मुंबई मध्ये आज सकाळपासून जोरदार वारा आणि पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आज मुंबई मध्ये कोविड 19 चे व्हॅक्सिनेशन संपूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. मुंबई मध्ये समुद्रकिनारी भागापासून नागरिकांनी दूर रहावे. आज समुद्राला उधाण येण्याची शक्यता असल्याने हे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान मुंबईला थेट चक्रीवादळाचा धोका नसला तरीही शहराच्या नजिकच्या भागातून समुद्रात हे वादळ पुढे वाटचाल करत असल्याने हा खबरदारीचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबई च्या सहाही समुद्रकिनारी फायर ब्रिगेडच्या टीम्स तैनात आहेत. आज वांद्रे-वरळी सी लिंक देखील रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. Mumbai Rains Update: मुंबईत काल रात्रीपासून सोसाट्याच्या वा-यासह पावसाची संततधार सुरुच, पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता-IMD

Cyclone Tauktae Windy Tracker 

गुजरात मध्ये या चक्रीवादळाचा लॅन्डफॉल अपेक्षित आहे. हे वादळ मागील तासांत 20kmph वेगाने पुढे सरकत आहे. जसे हे पुढे जाईल तसे या चक्रीवादळाचे रूप भीषण होत जाईल असा अंदाज असल्याने सार्‍यांनीच काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

मागील वर्षी देखील मान्सून पूर्वी महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला होता. त्यावेळेस झालेले नुकसान पाहता यंदा यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. सावधानतेचा इशारा देत समुद्र किनारी आणि कच्च्या घरात राहणार्‍या अनेक नागरिकांना तात्पुरत्या निवार्‍यासाठी शाळा आणि अन्य भागांमध्ये हलवण्यात आले आहे.