Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देश कोरोना विषाणूशी लढत असताना निसर्ग चक्रीवादळाने (Cyclone Nisarga) संपूर्ण राज्यातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नव निर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) राज्यातील जनतेचे मनोबल बाढविण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील जनता प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी समर्थ आहे, असा विश्वास मनसेच्या ट्विटर हॅंडलवरून व्यक्त करण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यातील नागरिकांना बसला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील नागरिकांना अनेक अडचणींना समोरे जावा लागले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे समजत आहे.

महाराष्ट्र गेल्या दोन महिन्यापासून कोरोना संकटाशी झुंज देत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोराबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत चालली आहे. यातच महाराष्ट्रासमोर निसर्ग या नावाच्या चक्रीवादळाने धडक दिली आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत. तर, काही भागात अनेक वाहनांचे आणि सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचेही नुकसान झाले आहे. या सर्व संकटाशी लढत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील जनतेचे मनोधौर्य वाढवण्याचे प्रयत्न केले आहे. राज्यात कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी! अशा आशायाचे ट्वीट मनसेने केले आहे. हे देखील वाचा- Covid-19 संकटात Hindustan Unilever कंपनीकडून 10 कोटीहून अधिक वैद्यकीय संसाधनांची मदत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ट्वीट-

निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने सतर्क राहात पूर्वतयारी केली आहे. मुंबई महापालिकेचे सर्व विभाग व आपत्कालीन व्यवस्थापन समुह परिस्थतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रीपासून सज्ज आहे. निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्याचे काम मुंबई पोलीस आणि महानगर पालिकेतर्फे करण्यात येत आहे.