CM Devendra Fadnavis (Photo Credits: File Photo)

काल (गुरुवार, 14 मार्च) संध्याकाळी मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाज महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Terminus) जवळील पादचारी पुल कोसळून (Footover Bridge Collapses) झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला तर 36 जण गंभीर जखमी झाले. या गंभीर दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज (शुक्रवार, 15 मार्च) सकाळी घटनास्थळाची पाहाणी केली तसंच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूसही केली. रेल्वेमंत्री चौकशीची टिमकी वाजवणार आणि जबाबदारी झटकणार- राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन संतप्त प्रतिक्रीया

या गंभीर दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच आज संध्याकाळपर्यंत या दुर्घटनेची नेमकी जबाबदारी कोणाची हे ठरवावे, असे आदेशही पालिका आयुक्तांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. स्ट्रॅक्चरल ऑडिट केल्यानंतरही जर अशा प्रकारच्या दुर्घटना होणार असतील तर ते अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे ऑडिट झालेल्या पुलांची पुन्हा तपासणी व्हावी, असेही त्यांनी सांगितले. नॉर्मल वॉर्डमध्ये असलेले 10 जखमींची प्रकृती आता ठीक असून ICU मधील एका पीडित जखमीच्या जीवालाही कोणताही धोका नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सीएसएमटी जंक्शन आणि जे.जे. फ्लायओव्हर परिसरातील वाहतूक बंद, 'या' पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं Mumbai Police चं मुंबईकरांना आवाहन

पूल कोसळल्याच्या घटनेसंदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारच्या वतीने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पूल दुर्घटनेतील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.