मायानगरी मुंबई महिलांसाठी असुरक्षित; गेल्या 5 वर्षात महिलांवरील अत्याचारात दुप्पटीने वाढ
Image Used For Representational Purpose Only |(Photo Credits: Newsplate)

अस्तित्व, ओळख मिळवून देण्यासोबतच स्वप्नपूर्तीचा आनंद देणारी मायानगरी मुंबई महिलांसाठी असुरक्षित असल्याचे एका अहवालातून समोर आलं आहे. या अहवालानुसार गेल्या पाच वर्षात महिलांवरी बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात दुप्पटीने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रज्ञा फाऊंडेशनने सादर केलेल्या या अहवालानुसार, 2013-2014 ते 2017-2018 या कालावधीत मुंबईत बलात्काराच्या घटनांमध्ये 83% तर विनयभंगाच्या घटनेत 95% वाढ झाली आहे.

या अहवालानुसार, वरळी, भायखळा, कुलाबा, मलबार हिल या परिसरात बलात्काराच्या गुन्ह्यांत 172% वाढ झाली आहे तर उत्तर मुंबईत विनयभंगाच्या घटनांमध्ये 186% वाढ झाली आहे. इतकंच नाही तर अल्पवयीन मुले आणि तरुणांवरील लैंगिक अत्याचारातही 18% वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

अत्याचार, विनयभंग, बलात्कार अशाने पीडित व्यक्तींचे तक्रार नोंदवण्याचे प्रमाण वाढल्याने गुन्हांची नोंद होण्याचं प्रमाण वाढल्याची माहिती मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराचे प्रमाण कमी होणार आहे का? त्यासाठी पोलिस दल, सरकार काही ठोस पाऊले उचलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर महिलांनी देखील आपल्या सुरक्षिततेच्या बाबतीत सतर्क असणे, गरजेचे आहे.