मुंबई लोकल (Mumbai Local) ही शहरात प्रवाशांची लाईफलाईन आहे. सध्या मुंबई लोकल मधील गर्दी आणि प्रवासांचा जीव मुठीत घेऊन होणरा प्रवास यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पण मुंबईच्या लोकल मध्ये अनेक जण विना तिकीट तसेच फर्स्ट क्लास (First Class) मध्ये वैध तिकीट नसताना चढल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. अशामध्ये आता मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी खास हेल्पलाईन लॉन्च केली आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान अडचण जाणवल्यास आता प्रवासी आता व्हॉट्सॲपद्वारे आपली तक्रार दाखल करू शकणार आहेत. AC EMU/ First class मधील तक्रारी करण्यासाठी 7208819987 या नंबर वर मेसेज पाठवता येणार आहे. दरम्यान रेल्वेने प्रवाशांना वैध तिकीट काढूनच प्रवास करण्याचं आवाहन केले आहे.
मध्य रेल्वेकडून व्हॉट्सअॅप हेल्पलाईन जारी
Suburban passengers travelling in AC EMU/ First class coaches can now WhatsApp on mobile number 7208819987 for complaints related to unauthorised travel.
"We appeal to all passengers to travel on a valid ticket"@Central_Railway @drmmumbaicr@YatriRailways
— Sr DCM, Mumbai, CR (@srdcmmumbaicr) September 9, 2024
मुंबई लोकल मध्ये सीट वरून एकमेकांना धक्काबुक्की होते. अनेकांचे भांडणाचे व्हिडिओ देखील वायरल झाले आहेत. त्यामुळे आता मुंबई लोकलच्या मार्गावर ट्रेनची संख्या वाढवणं आणि वेळापत्रकानुसार ट्रेन वेळेवर चालवणं याची सातत्याने मागणी होत आहे. मागील 3 दिवसांपासून रोजच काही तांत्रिक दोषांमुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत असल्याने प्रवाशांचे नाहक हाल होत आहेत.