Devendra Fadnavis, Uddhav Thackeray | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाने (Coronavirus) धुमाकूळ घातला असताना राज्यातील राजकारणाने पुन्हा पेट घेतल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवले आहे. रुग्णालयाबाहेर अन्यत्र झालेले आणि विविध प्राधिकरणांनी कोरोनामुळे मृत्यू असे प्रमाणपत्र दिलेल्या सुमारे एक हजार मृत्यूंची नोंद अद्याप अधिकृत आकडेवारीत का करण्यात नाही? ते दडवण्यात कारण काय आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. तसेच आकडेवारीची अचूकता हाच करोनाविरोधातील लढाईसाठी विश्लेषणाचा मुख्य आधार असल्याने याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईत ज्या रूग्णांचा मृत्यू रूग्णालयाबाहेर झालेला आहे, असे मृत्यू अद्यापही दाखविण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकारी किंवा तत्सम प्राधीकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले आहे, अशांचा आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असेही किमान 1000 मृत्यू मुंबईत आहेत, ज्यांची अजूनही नोंद झाली नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान 450 मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याचदिवशी किंवा फार तर, 72 तासांत तशी नोंद होणे आवश्यक आहे. परंतू, 3 महिने उलटले तरी मृत्यू रिपोर्ट न होता आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून ते मृत्यूसंख्येत अधिक करणे, ही अतिशय चुकीची रणनीती आहे, असेही त्यांनी पत्रात लिहले आहे. हे देखील वाचा- 'अग्रलेखाची भाषा अशी असते का?' आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला टोला

देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट-

महाराष्ट्रात गुरुवारी तब्बल 4 हजार 841 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 192 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 47 हजार 741 वर पोहचली आहे. यापैकी 6 हजार 931 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 77 हजार 453 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.