COVID19 Vaccine: पुणे येथील सीरम इंस्टिट्युट मधून कोविशिल्ड लस आज देशातील 13 ठिकाणी पोहचवली जाणार
Covid-19 Vaccine Dry Run | Representational Image | (Photo Credits: PTI)

COVID19 Vaccine:  कोरोना व्हायरस वरील लस कधी येणार याची सर्वजण प्रतिक्षा करत आहेत. मात्र आता कोरोनापासून बचाव करणारी पुण्यातील सीरम इंस्ट्यिट्युट (Serum Institute) मध्ये तयार करण्यात आलेली कोविशिल्ड (Covishield) लस आज देशभरातील 13 ठिकाणी पोहचवली जाणार आहे. या लसीची पहिली बॅच रवाना झाली आहे. या वॅक्सिनचे ट्रक आता पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यानंतर लस देशातील विविध ठिकाणी पाठवली जाणार आहे. देशात येत्या 16 जानेवारी पासून लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.(COVID19: भारतात गेल्या सात महिन्यात 33 टन कोरोना व्हायरसच्या घनकचऱ्याचा साठा तर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडाळाची माहिती)

कोविशिल्ड लसीचे ट्रक हे विमानतळावर पोहचेपर्यंत त्यांच्यासोबत पोलिसांची गाडी सुद्धा त्यांच्यासोबत दिसून आली. सीरम इंस्टिट्युटची ही लस पुणे विमानतळावरुन कार्गो विमानांच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. सोमवारी केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यास सीरम इंस्टिट्युला सांगितले होते. त्यानुसार आजपासून लसीचे डोस पाठवण्यात येत आहे.दरम्यान, कोविशिल्ड लसीचा डोस प्रथम गुजरात येथे  सकाळी 11.45 च्या दरम्यान पोहचवला जाणार आहे. (Coronavirus in Maharashtra: कोरोना रुग्णांच्या मृत्युच्या बाबतील महाराष्ट्रात राज्य जगात अव्वल; गाठला 50 हजाराचा टप्पा)

Tweet:

तर 16 जानेवारी पासून देशभरात कोविड-19 च्या लसीकरण मोहिमेला  सुरुवात होणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात साधारणपणे 3 कोटी आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स  यांना प्राधान्य  देण्यात येईल. त्यांनतर 50 वर्षांवरील आणि गंभीर आजार असलेल्या 50 वर्षांखालील व्यक्तींना लस देण्यात येईल. त्यांची संख्या साधारणपणे 27 कोटी इतकी आहे, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे.