Coronavirus Outbreak (Photo Credits-IANS)

भारतामध्ये कोरोना विषाणूने (Coronavirus) शिरकाव केल्यानंतर ज्या काही राज्यांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळून आले त्यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) अव्वल होता. राज्यात काल 3,581 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 2,401 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. अशाप्रकारे एकूण 18,61,400 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 52,960 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.7% झाले आहे. मात्र काल 57 जणांचा मृत्यू झाला आहे, अशा प्रकारे महाराष्ट्रील कोरोना रुग्णांच्या मृत्युच्या संख्येने 50 हजाराचा टप्पा ओलांडून तो 50,027 झाला आहे.

महाराष्ट्र हे जगातील असे राज्य बनले आहे जिथे कोरोना मुळे सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र सरकार कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी अनेक उपयोजना राबवत आहे. त्याचीची परिणीती म्हणून महाराष्ट्रातील रुग्ण संख्या देवसेंदिवस घटत आहे व रिकव्हरी रेटही वाढत आहे. सध्या जगात अमेरिकेमध्ये सर्वाधील कोरोना रुग्ण आढळून आले असून, तिथली एकूण रुग्णसंख्या 22,699,938 झाली आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 381,480 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 13,393,078 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या अमेरिकेमध्ये 8,925,380 सक्रीय रुग्ण आहेत.

महाराष्ट्रानंतर न्युयॉर्क राज्यात सर्वाधीक 39,447 मृत्यूंची नोंद झाली आहे. दरम्यान, भारतामध्ये गेल्या 24 तासांत 18,645 नवीन कोरोना विषाणू रुग्णांची व 201 मृत्यूंची नोंद झाली आहे. काल 19,299 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह एकूण प्रकरणांची संख्या 1,04,50,284 झाली असून, सक्रिय प्रकरणे 2,23,335 इतकी आहेत. आतापर्यंत एकूण डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1,00,75,950 इतकी असून मृत्यूची संख्या 1,50,999 इतकी आहे. (हेही वाचा: 16 जानेवारी पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात; आरोग्यसेवक, कोरोना योद्धांना प्राधान्य)

दुसरीकडे 16 जानेवारी पासून भारतामध्ये कोविड-19 च्या लसीकरण मोहिमेला (Vaccination Drive) सुरुवात होणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात साधारणपणे 3 कोटी आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स यांना प्राधान्य  देण्यात येईल.