
COVID19 Vaccination in Mumbai: देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण अभियान सुरु आहे. याच दरम्यान, मुंबईत लस घेतलेल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशातच लस घेण्यासाठी नागरिक आता मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला लसींचा तुटवडा असल्याने मुंबईत आज आणि उद्या (13 ऑगस्ट) लसीकरण बंद राहणार आहे. याबद्दल मुंबई महारपालिकेने माहिती दिली आहे.(Mumbai Local E-Pass: रेल्वेप्रवाशांसाठी महत्वाची बातमी! ई- पास सुविधा उपलब्ध, 'या' पद्धतीने करता येईल अर्ज)
नागरिकांना एका बाजूला लोकलने प्रवास करण्याचा आनंद आहे. पण लस घेणे सुद्धा महत्वाचे आहे. परंतु लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लस मिळणार नाही असे फलक लावल्याचे दिसून आले. यामुळे नागरिक निराशेने पुन्हा घरी परतत आहेत.
मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना लसीकरणाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी असे म्हटले की, केंद्र सरकारकडून राज्याला लसींचा पुरवठा केला जात आहे. परंतु केंद्राकडून राज्याला मोठ्या प्रमाणात लसींचा साठा पाठवला जात नाही आहे. तर किशोरी पेडणेकर यांनी पुढे असे ही म्हटले की, आदित्य ठाकरे सुद्धा CSR च्या माध्यमातून मुंबईत मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत.(Covid-19 Update in Mumbai: मुंबईत आज 279 नवे कोरोनाग्रस्त; 7 रुग्णांचा मृत्यू)
एका बाजूला लसींचा तुटवडा तर दुसऱ्या बाजूला दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची संधी देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी असे म्हटले आहे की, महापालिका सार्वजनिक ठिकाणे जसे ट्रेन, मॉल, रेस्टॉरंट, हॉटेल मध्ये अशांनाच परवानगी आहे ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र पालिकेने एक डोस घेतलेल्यांना सुद्धा परवानगी द्यावी कारण कधी पर्यंत लोक घरी बसतील. त्याचसोबत लसींचा तुटवडा सुद्धा ऐवढा आहे की, त्यांना वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही आहे.