कोविडच्या कठीण काळात UCG ने घेतलेला परीक्षेचा निर्णय योग्य नाही, मोदी सरकारने याचा पुनर्विचार करावा- बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat | (Photo credit : facebook)

देशात कोरोना व्हायरसचे महासंकट असताना युसीजी यांनी युनिव्हर्सिटीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केले. तसेच विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन पास करण्यात येणार नाही असे ही त्यांनी स्पष्ट केले. युसीजीने परीक्षेसाठी सर्व खबरदारी घेणार असल्याचे म्हटले असले तरीही यासाठी विरोध करण्यात येत आहे. याच दरम्यान, आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा परीक्षा घेण्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. थोरात यांनी असे म्हटले आहे की, कोविडच्या कठीण काळात UCG ने घेतलेला परीक्षेचा निर्णय योग्य नाही आहे. त्यामुळे मोदी सरकारने याचा विचार करावा असे ही थोरात यांनी म्हटले आहे.(CBSE Syllabus Reduction: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 9 ते 12 पर्यंतच्या अभ्यासक्रमात 30% कपात)

थोरात यांनी पुढे असे म्हटेल आहे की, कोविडच्या महासंकटामुळे सर्वच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष कसे वाचवायचे याबाबत विचार करावा लागणार आहे. तसेच परीक्षा घेण्याबाबत सुद्धा अद्याप चर्चा सुरु आहे. यामध्ये युसीजीने जो निर्णय घेतला आहे तो परीक्षा घेण्याचा आहे. तर कर्नाटक येथे 10 वीच्या परीक्षेनंतर 10 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळे. त्यामुळे आपण एका बाजूला आपण कोरोना संबंधित काळजी घेण्यास सांगतो आणि दुसऱ्या बाजूला परीक्षेचा निर्णय ही घेतो. या सगळ्या गोष्टी योग्य नाहीत त्यामुळे योग्य तो विचार करावा असे थोरात यांनी स्पष्ट केले आहे.(CBSE Class 12th, 10th Results यंदा 11 व 13 जुलै दिवशी जाहीर होणार असल्याचे व्हायरल पत्रक खोटं; बोर्डाकडून निकालाच्या तारखा जाहीर नाही)

तर युसीजीने युनिव्हर्सिटीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात असे आदेश दिले होते. यावर राहुल गांधी यांनी सुद्धा आक्षेप घेतला होता. राहुल गांधी यांनी ट्वीट करत असे म्हटले होते की, कोविडच्या काळात परीक्षा घेणे अन्यायकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे युसीजीने ऐकले पाहिजे. तसेच परीक्षा रद्द  करून विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीच्या कामगिरीनुसार गुण द्यावेत अशी मागणी राहुल गांधी यांनी  केली आहे.