कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग महाराष्ट्र आणि देशात वाढत असतान केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा सामना कोरोना लसीवरुण रंगला आहे. त्यात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर कोरोना लस (Covid Vaccine) वाया घालवली असा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांचा आरोप खोडून काढत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रकाश जावडेकर यांना प्रत्त्युत्तर देताना म्हटले आहे की, 'लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये.याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. '
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रकाश जावेडकर यांचे आरोप खोडून काढताना म्हटले आहे की, ''लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये.याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे''. आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा, असा टोलाही राजेश टोपे यांना लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोरोना आढाव्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मी सहभागी होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्र कोरोना विरुद्धच्या लढाईत कुठेही मागे नव्हता आणि नाही हे ठामपणे सांगितले, असे स्मरणही राजेश टोपे यांनी जावडेकर यांना ट्विटरच्या माध्यमातून करुन दिले आहे. (हेही वाचा, Maha Vikas Aghadi सरकार म्हणजे महा वसुली आघाडी- प्रकाश जावडेकर)
दरम्यान, प्रकाश जावडेकर यांच्या आगोदर केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली होती. ही टीका करताना महाराष्ट्राने कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात दिरंगाई दाखवली. एकट्या महाराष्ट्रामुळे देशातील कोरोना नियंत्रणाच्या मोहिमेला फटका बसला, असे हर्षवर्धन यांनी म्हटले होते.
लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये.याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. https://t.co/8ewkNm216D
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 8, 2021
प्रकाश जावडेकर यांनी डॉ. हर्षवर्धन यांचीच री ओढत पुढे म्हटले की, महाराष्ट्र सरकारने कोरोना प्रकरण निटपणे हाताळले नाही. केंद्र सरकारने दिलेली लस महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणावर वाया घालवली. ही लस वाया गेल्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांना लसीकरणापासून दूर रहावे लागले असेही जावडेकर म्हणाले. जावडेकरांच्या आरोपातील फोलपणा राजेश टोपे यांनी आकडेवारीसह दाखवून दिला आहे.