ज्या नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जाईल त्याला 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विमानतळावर जर मास्क घातला नाही तर दंड भरावा लागणार हे नक्की. हा नियम 1 एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे. मास्क घालताना नागरिकांनी नाक आणि तोंड झाकले नाही किंवा सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केल्यास ही कारवाई सदर व्यक्तीच्या विरोधात केली जाणार आहे.
मुंबई विमानतळावर या संबंधितच्या सुचना आणि गाइडलाइन्स या डिजिटल बोर्डवर लावण्यात आल्या आहेत. त्याचसोबत दररोज विमानतळावर PA सिस्टिमच्या माध्यमातून कोरोनापासून बचाव करण्यासंबंधितच्या सुचनांची घोषणा केली जात आहे. या व्यतिरिक्त ग्राउंड मार्शल्सकडून सुद्धा नागरिकांना नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन केले जात आहे. मात्र जर एखाद्याने नियमाचे उल्लंघन केल्यास त्याच्याकडून मार्शल दंड स्विकारु शकतो. परंतु व्यक्तीने त्याला दंड देण्यास मनाई केल्यास अधिकाऱ्यांकडे त्याला पुढील कारवाईसाठी नेले जाईल असे एमआयएएल यांनी स्पष्ट केले आहे.(Mumbai: मुंबईतील बहुतांश रहिवाशी इमारतीत बाहेरील व्यक्तीस प्रवेश बंदी, वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे निर्णय)
तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कोविड-19 च्या आरटी-पीसीआर चाचणीच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. चाचण्यांच्या किंमतीत 30 टक्कांनी घट करण्यात आली असून आता चाचणीसाठी 600 रुपये मोजावे लागणार आहेत. राज्यातील कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत.