Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

मुंबईत नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे अन्यथा दुसरा लॉकडाऊन लावावा लागेल असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये तुफान वाढ होत आहे. त्यामध्ये रहिवाशी इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्येच कोरोनाच्या रुग्णांचा आकडा सर्वाधिक असल्याचे समोर आले होते. अशातच आता मुंबईतील बहुतांश रहिवाशी इमारतींनी बाहेरील व्यक्तीला येण्यास प्रवेश बंदी केली आहे. तर कोविडच्या रुग्णांची वाढती आकडेवारी पाहून हा निर्णय रहिवाशी इमारतींकडून घेण्यात आला आहे.(Covid-19 Vaccination: मुंबईत रविवारीदेखील लसीकरण केंद्र सुरू राहणार; BMS ने ट्विट करत नागरिकांना केलं लस घेण्याचं आवाहन)

बहुतांश सोसायट्यांनी बाहेर व्यक्तीस आतमध्ये येण्यास परवानगी नाकारली आहे. मात्र घरकाम करणाऱ्या व्यक्ती, दुध किंवा न्यूजपेपर घरोघरी टाकणाऱ्या व्यक्तीला इमारतीमध्ये प्रवेश देत आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा इमारतीत येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे रहिवाशांना इमारतीच्या गेटजवळ जाऊन त्यांचे कुरियर किंवा फुड पार्सल घेऊन यावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कुलाबामधील उच्चभ्रु सोसायटीत सुद्धा लहान मुलांना इमारतीच्या प्ले गार्डनमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे त्यांनी कॉमन पेसेज किंवा दरवाज्याबाहेर लहान मुलांनी खेळावे असे सांगितले आहे. दुसऱ्या बाजूला पाली हिल मधील एका रहिवाशी इमारतीने असे ठरविले आहे की, जर एखाद्याने कॉमन परिसरात मास्क घातला नाही तर त्याच्याकडून 1 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.(Lockdown In Amravati: अमरावतीत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद; नियमांचे पालन केल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट)

शनिवारी महापालिकेकडून पुन्हा एकदा गाईडलान्स लागू करण्यात आल्या असून नागरिकांनी घरी, सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या जागी किंवा हाउसिंग सोसायटीमध्ये त्याचे पालन करावे असे म्हटले आहे. तर गाईडलाइन्सनुसार, रहिवाशी इमारतींनी लोकांचे तापमान आणि ऑक्सिजनचा स्तर तपासावा.  त्याचसोबत बाहेरुन येणारी व्यक्ती, डिलिव्हरी एजंट किंवा अन्य कोणत्याही कामासाठी येणाऱ्या व्यक्तीसाठी सॅनिटायझेशनची सुविधा इमारतीकडून करण्यात यावी.