Covid-19 Vaccination: मुंबईत रविवारीदेखील लसीकरण केंद्र सुरू राहणार; BMS ने ट्विट करत नागरिकांना केलं लस घेण्याचं आवाहन
Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

Covid-19 Vaccination: देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. गेल्या 24 तासात येथे सुमारे 50 हजार नवीन घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर एकट्या मुंबईतच 9 हजाराहून अधिक प्रकरणे आढळली आहेत. या सर्व बाबी लक्षात घेत सरकार आता लसीकरण कार्यक्रमास वेग देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे रविवारी मुंबईत सर्व लसीकरण केंद्रे खुली राहणार आहेच. 45 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व लोक लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करण्यास सक्षम असतील. बीएमसीने (BMC) ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

बीएमसीने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "या रविवारी, व्हायरस खाली आणा. शहराच्या लसीकरण कार्यक्रमास वेग देण्यासाठी शहरातील सर्व लसीकरण केंद्रे आज कार्यरत होतील. आपले वय 45 वर्ष किंवा त्यापैक्षा जास्त असल्यास, आधार किंवा पॅन किंवा कोणताही फोटो आयडी सोबत आणून लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्या." (वाचा - Coronavirus in Maharashtra: राज्यात पुन्हा जिम, व्यायामशाळांवर निर्बंध येणार? राज्याच्या हिताच्या निर्णयाला जिम चालकांनी सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन)

शनिवारी मुंबईत 9 हजारांहून अधिक कोरोना प्रकरणांची नोंद झाली. त्यानंतर कोरोनापासून संरक्षणाचे काही मार्ग बीएमसीने शेअर केले आहेत. बीएमसी म्हटलं आहे की, "सकारात्मक घटनांच्या संख्येत तीन पट वाढ झाली आहे. परंतु, मुंबईकरांनाचा आवश्यक पाठिंबा मिळाल्यासचं या संकटाचा सामना करणे शक्य आहे. मास्क घालणे, सामाजिक अंतर कायम ठेऊन आणि आपले हात वारंवार धुऊन आपण कोरोनाचा संसर्ग टाळू शकतो. आपण घरी असल्यास आपल्या ऑक्सिजनची पातळी तपासून पहा. आपण कोणाला भेटत आहात, याचे रेकॉर्ड लक्षात ठेवा. याशिवाय तुम्ही घरी कुटूंबियांसह जेवताना समोरासमोर बसण्याऐवजी शेजारी बसा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. याशिवाय जेव्हा तुम्ही बाहेरून आलात तेव्हा आंघोळ केल्यावर आपले कपडे व्यवस्थित धुवा. नेहमी एक कागद आपल्याकडे ठेवा, ज्याचा वापर लिफ्ट बटण दाबण्यास किंवा दारे उघडण्यास करा."

दरम्यान, कोरोना विषाणूने महाराष्ट्रातील सर्वात जीवघेणे रूप धारण केले आहे. शनिवारी, 24 तासांमध्ये 49,447 नवीन प्रकरणे आढळून आली आणि 277 लोक मृत्यूमुखी पडले. देशातील एकूण प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे केवळ महाराष्ट्रातील आहेत. सध्या राज्यात 21 लाखाहून अधिक लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सक्रिय प्रकरणांची संख्या 4 लाखांच्या वर गेली आहे. त्याचवेळी शनिवारी मुंबईत विक्रमी 9,090 नवीन प्रकरणे समोर आली आणि 27 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.