Coronavirus in Maharashtra: राज्यात पुन्हा जिम, व्यायामशाळांवर निर्बंध येणार? राज्याच्या हिताच्या निर्णयाला जिम चालकांनी सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

सध्या महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाची संख्या चिंतेचा विषय आहे. राज्यात सध्या अनेक गोष्टींवर निर्बंध आहेत मात्र हे नियम अजून कठोर होण्याची शक्यता आहे. कदाचित याची सुरुवात जिम (Gym) किंवा व्यायामशाळा यांपासून होऊ शकते. आता पुन्हा आपल्याला कोरोनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ‘जान है तो जहान है..’ या उक्तीनुसार जीव राहिला, तर पुढे आपण व्यायाम करू शकणार आहे. त्यामुळे यापुढे राज्याच्या हिताचा म्हणून जो निर्णय घ्यावा लागेल, त्यामध्ये व्यायामशाळा-जिम चालकांनी सर्व शक्तिनिशी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज केले.

राज्यातील व्यायाम शाळांचे मालक, संचालक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी आज कोरोना परिस्थितीबाबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, जिममध्ये तुम्ही सर्व सुविधा आणल्या, ट्रेड मिल आणल्या, उपकरण आली, पण चांगला प्रशिक्षक नसेल, तर काय होईल, तशीच स्थिती आता निर्माण होऊ शकते. बेड्स, व्हेंटिलेटर्स, औषधांचा साठा सगळ्या काही गोष्टी सुरळीत करत आहोत. पण डॉक्टर्स, नर्सेस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे कठीण होणार आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जगाने लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारला आहे. आता पुन्हा आपल्याला कोरोनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, व्यायाम शाळा-जिम चालकांना यापूर्वी ज्या काही सूचना दिल्या होत्या. त्याचे पालन होत आहे, ही गोष्टी चांगली आहे. पण आता आपण गतवर्षीच्या पूर्वपदापेक्षाही जास्त बिकट परिस्थितीकडे गेलो आहेत. परिस्थिती अशीच राहीली, तर राज्य गर्तेत जाईल. यापूर्वीही निर्बंध आपण हळूहळू लावले होते, आणि पुन्हा हळूहळू शिथिल केले होते. तशीच वेळ आली, महाराष्ट्राच्या हिताचा मार्ग स्वीकारायला हवा. जो निर्णय घेऊ सगळ्यांच्या हितांचा असाच असेल. त्यामध्ये सगळ्यांनी सर्वांनी सर्व शक्तीनिशी सहकार्य करावे. (हेही वाचा: सीएम उद्धव ठाकरे यांचा वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरकांशी संवाद; जाणून घेतले कोरोना विषाणू रोखण्यासाठीचे पर्याय)

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, जिम संचालक एसओपीचे पालन करत आहेत, हे प्रशंसनीय आहे. बऱ्याच जिम, ज्या विशेषतः छोट्या जागेत आहेत. त्याठिकाणी संक्रमण होण्याची शक्यता आहे. आपल्याला या चिंताजनक परिस्थितीवर मात करण्यासाठी कडक निर्बंध लावावे लागतील. यात स्वयंशिस्त हीच महत्त्वाची आहे. यासाठी राज्यसरकारला सहकार्य करावे