COVID-19 Vaccination: मुंबईत हिरानंदानी इस्टेट वसाहतीमध्ये बनावट लसीकरण मोहिमेत फसवणूक झालेल्यांना BMC आज  पुन्हा देणार लस
Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात लसीकरण वेगवान करण्यात आलं पण मुंबई मध्ये या लसीकरण मोहिमेचा फायदा घेत काहींनी लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कांदिवली मध्ये हिरानंदानी इस्टेट वसाहतीमध्ये नागरिकांची फसवणूक करून बनावट लस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पण आता या लसीकरण मोहिमेत फसवणूक झालेल्यांना मुंबई महानगर पालिकेकडून लस दिली जाणार आहे. बीएमसीच्या महावीर नगर वॅक्सिनेशन सेंटर मध्ये हे लसीकरण पार पडणार आहे.

दरम्यान 30 मे दिवशी हिरानंदानी इस्टेट वसाहतीमध्ये बनावट लसींचे एक कोविड 19 लसीकरण पार पडले होते. शुक्रवार (23 जुलै) दिवशी पोलिस तपासाचा अहवाल हाती आल्यानंतर या लसीकरणामध्ये फसवणूक झालेल्यांची नावं पडताळण्यात आली आहेत. आता नागरिकांची नावं तपासून त्यांना पुन्हा बीएमसी लस देणार आहे. Fake Vaccination In Mumbai: मुंबईतील बनावट लसीकरण प्रकरणी मुंबई पोलिसांकडून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल.

कांदिवली मध्ये अंदाजे 390 लोकांची बनावट लस प्रकरणी 15 जून दिवशी पोलिस स्टेशन मध्ये धाव घेतली. त्यांनी सर्टिफिकेट्स तयार झाली नसल्याने पोलिसांना आपली शंका बोलून दाखल तक्रार नोंदवली. त्यानंतर मुंबई शहरात 6 बोगस व्हॅक्सिन कॅम्प्स आढळले. यामध्ये कांदिवलीत शिवम हॉस्पिटल चालवणार्‍या एका डॉक्टर दांम्पत्यासोबत 16 जण अटकेत आहेत. यामधील आरोपींनी लसीऐवजी सलाईन वॉटर वापरल्याचं सांगितलं आहे.

8 जुलै दिवशी हिरानंदानी इस्टेट मध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांच्या पुन्हा लसीकरणाबाबत बीएमसीने केंद्रीय यंत्रणांकडे परवानगी मागितली होती.