Matheran Shocker: माथेरान (Matheran) येथे फिरण्यासाठी आलेल्या रस्त्नागिरितील दाम्प्त्याचा अखेर मृतदेह (Deathbody) आढळून आला आहे. पार्थ काशिनाथ भोगटे आणि त्यांची पत्नी श्री लक्ष्मी पार्थ भोगटे अशी मृतांची नावे आहे. हे दोघे 11 जुलै रोजी माथेरानला फिरण्यासाठी गेले होते. दोघे ही राजापूर येथील रहिवासी होते. (हेही वाचा- पंढपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचा अपघात, 5 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, सांयकाळी दर्शनासाठी जात असल्याचे सांगून जोडपे हॉटेल ब्राईट लॅंडमधून बाहेर निघाले. दुसऱ्या दिवशी ते परतलेच नाही असं हॉटेल मालकाच्या लक्षात आलं, त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. स्थानिक पोलिसांनी या जोडप्याचे फोटो व्हॉट्सअॅपवर ग्रुपवर प्रसारित केला. दोघे जण बेपत्ता झाल्याची माहिती गावात सांगितली.
स्थानिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपासले. शेवटचे इको पॉइंटकडे जाताना दिसले आणि या जोडप्यांने शेवटचे लोकेशन दरी जवळ सापडले. माथेरानची सह्याद्री रेस्क्यू टीम तेव्हापासून या दाम्पत्याचा खोऱ्यात शोध घेत आहे. पार्थच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
अखेर सोमवारी रेस्क्यू टीमला अखेर या जोडप्याचे मृतदेह सापडले. प्राथमिक माहितीनुसार, रायगडचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे म्हणाले, ते दोघे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे. त्याचे नुकसान झाले. ही आत्महत्या आहे की, हत्या याचे संभाव्य उत्तर शोधण्यासाठी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. आता अहवालाची प्रतिक्षा आहे.