Coronavirus Vaccine: महाराष्ट्रात मंगळवार पर्यंत 33,044 जणांचे लसीकरण झाले. मात्र सोमवार पासून लसीकरणाच्या आकड्यात वाढ झाली पण गेल्या आठवड्यापेक्षा ती कमी होती. त्यापैकी 20 हजार जण हे जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील व्यक्तींसह विविध आजार असलेल्यांना लस दिली गेली.राज्यात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मात्र लसीचा डोस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची प्रथमच घटना भिवंडी येथे घडली आहे. या प्रकरणी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाच्या लसीमुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे आता बोलणे योग्य नाही. कारण शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर सर्वकाही स्पष्ट होईल. सुखदेव किरदात (45), मनोरमा नगर येथील स्थानिक असून एका खासगी डॉक्टरांसाठी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. पण मंगळवारी ते कोरोना वरील लस कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी ते भाग्या नगर येथील लसीकरण केंद्रात गेले.
किरदात यांना लस दिल्यानंतर त्यांना पुढील 15-20 मिनिटांसाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असता ते बेशुद्ध झाले. त्यावेळी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना गांधी मेमोरियल मध्ये दाखल केल्याचे डॉ. के आर खरात या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. तेथे नेल्यानंतर किरदात यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दिला गेला.(Mumbai: BMC केंद्रांव्यतिरिक्त आता 29 अतिरिक्त खाजगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी; जाणून घ्या यादी)
खरात यांनी असे म्हटले की, किरदात यांनी पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना कोणतीही समस्या आली नाही. त्याचसोबत ते गेली तीन वर्ष उच्चरक्तदाबावरील औषधे सुद्धा घेत होते. त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा असे म्हटले की, गेल्या एक वर्षापूर्वी सुद्धा ते बेशुद्ध झाले होते. त्याचसोबत किरदात हे दारुचे सेवन सुद्धा करायचे. मात्र आता त्यांचे शवविच्छेदन रिपोर्ट्स समोर येईपर्यंत काहीच सांगता येत नाही असे त्यांनी म्हटले.(COVID-19 Vaccine: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही घेतली कोरोनाची लस)
आतापर्यंत देशात 40 जणांचा कोरोनाच्या लसीमुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. यामधील 17 जणांचे शवविच्छेदन सुद्धा करण्यात आले नाही. तर लसीकरणासाठी नागरिकांना आरोग्य सेतु अॅप किंवा कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.