Sharad Pawar (Photo Credit: Twitter)

भारतात आजपासून कोरोना लसीकरणाच्या (COVID-19 Vaccine) तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांनी आज दिल्लीमध्ये कोरोना लसीचा डोस घेतला आहे. त्यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही मुंबईतील जे.जे रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसेच कोरोनाविरोधात लढण्यासाठी जेष्ठ नागरिकांना लवकरात लवकर ही लस घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

"आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा", असे आवाहन शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमांतून केले आहे. हे देखील वाचा- मुंबई: Covishield लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह

शरद पवार यांचे ट्विट-

जेष्ठ नागरिकांसाठी 1 मार्चपासून कोरोना लसीकरण मोहीमेची सुरुवात झाली आहे. याचबरोबर अन्य आजार असलेल्या 45 वर्षाच्या पुढील नागरिकांनाही या टप्प्यात लस देण्यात येत आहे. मात्र, यासाठी कोविन (CoWin) पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.