Coronavirus Update: जगातील टॉप 10 कोरोना पीडित देशातील 6 देशांपेक्षा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांंचा आकडा अधिक, वाचा सविस्तर
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Coronavirus Update Worldwide: जगभरात कोरोनाचा सर्वाधिक प्रसार झालेल्या टॉप 10 देशांंच्या यादीतील तब्बल सहा देशांंच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रात (Coronavirus In Maharashtra) आजवर आढळलेल्या कोरोना रुग्णांंचा आकडा अधिक असल्याचे समजत आहे. रविवार, 30 ऑगस्ट दुपारी 4 पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकुण कोरोनाबाधितांंची संंख्या (Total COVID 19 Cases) 7,64,281 इतकी आहे. ही संख्या टॉप 10 कोरोनाबाधित देशांंच्या यादीतील सहा देशांंपेक्षा अधिक आहे. हे देश म्हणजे पेरु (6,39,435 रुग्ण), दक्षिण आफ्रिका (6,22,551 रुग्ण), कोलंबिया (5,99,884 रुग्ण), मेक्सिको (5,91,712 रुग्ण), स्पेन (4,39,286 रुग्ण), चिले (4,08,009 रुग्ण) असे आहेत. या संदर्भात जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी तर्फे माहिती देण्यात आली आहे. देशात कोरोना व्हायरस रिकव्हरी रेट 76.61 टक्क्यांवर; आजवर 27 लाखाहुन अधिक जण कोरोनामुक्त- आरोग्य मंंत्रालय

प्राप्त माहितीनुसार, कोरोनाबाधित देशांंमध्ये पेरु चा क्रमांंक पाचवा आहे. या पाठोपाठ दक्षिण आफ्रिका, कोलंंबिया, मेक्सिको, स्पेन, चिले या देशांंचा क्रमांंक आहे. अशा तुलनेत पाहायला गेल्यास सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांंची संंख्या ही अर्जेंटिना (4,01,239 रुग्ण), इराण (3,71,816 रुग्ण), UK (3,34,916 रुग्ण), सौदी अरेबिया (3,13,911 रुग्ण), बांंग्लादेश (3,08,925 रुग्ण), पाकिस्तान (3,04,947 रुग्ण), टर्की (2,67,064 रुग्ण), इटली (2,66,853 रुग्ण), जर्मनी (2,42, 835 रुग्ण) या देशांंच्या तुलनेत सुद्धा अधिक आहे. आश्चर्य म्हणजे एकेकाळी ज्या इटली मध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता तिथल्या परिस्थितीच्या तुलनेतही महाराष्टात अधिक कोरोना रुग्ण आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Wuhan मधील शाळा मंगळवार पासून सुरु; प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना जारी

दरम्यान, महाराष्टात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून आले असले तरी कोरोना रिकव्हरी रेट सुद्धा नक्कीच दिलासादायक आहे. सध्या महाराष्ट्रात एकुण 7,64,281 रुग्णांंपैकी केवळ 1,85,131 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 5,54,711 जणांंनी आजवर कोरोनावर मात केली आहे. राज्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट हा 72.58 टक्के आहे, तर मृत्युदर अवघा 3.15 टक्के आहे.