Coronavirus Update In India: एकीकडे मागील 24 तासात कोरोना व्हायरसच्या रुग्णसंंख्येत एकाच वेळी 78,761 रुग्णांंची मोठी वाढ झाली आहे परिणामी देशातील कोरोना रुग्णांचा (Coronavirus Total Number) आकडा हा 35,42,734 वर पोहचला आहे. साहजिकच हे आकडे चिंंताजनक भासत असले तरी आज केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाने (Union Health Ministry) एक दिलासादायक माहिती दिली आहे. देशात कोरोना रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे कोरोनाचा रिकव्हरी रेट (COVID 19 Recovery Rate) सुद्धा बराच वेगाने वाढत आहे. आज घडीला कोरोना रिकव्हरी रेट हा 76.61 टक्के इतका असुन आजवर एकुण 27,13,934 जणांंनी कोरोनावर मात केली आहे. यातील 64,935 जणांंना तर मागील 24 तासात डिस्चार्ज मिळाला आहे. (भारतामध्ये कोरोना व्हायरस चे 0.29 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर, 1.93 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये तर 2.88 टक्के रुग्ण ऑक्सिजनवर)
आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या कोरोना मृतांंचा टक्का खाली येउन 1.79 % वर पोहचला आहे. देशात आजवर कोरोनामुळे 63,498 मृत्यु झाले आहेत.. (देशात 30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज राहणार बंंद, 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार 'ही' सुट)
ANI ट्विट
India's #COVID19 recoveries today crossed 27 lakhs. With the recovery of 64,935 cases in the last 24 hours, recoveries in India today exceeded active cases by 3.55 times. India's recovery rate improved to 76.61% while Case Fatality Rate dipped to 1.79% today: Ministry of Health pic.twitter.com/e5Ods9m0kF
— ANI (@ANI) August 30, 2020
आजपर्यंत च्या कोरोना रिकव्हरी झालेल्या रुग्णांंच्या संंख्येने कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंंख्येच्या 3.55 पट पुढचा टप्पा गाठला आहे. देशात सध्या केवळ 7,65,302 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत
दरम्यान काल केंद्रीय गृहमंत्रालयाकडुन अनलॉक 4 ची घोषणा करण्यात आली आहे, ज्यानुसार 7 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे, सामाजिक/ सांंस्कृतिक/ शैक्षणिक कार्यक्रमात 100 जणांंच्या उपस्थितीला सुद्धा सरकारने हिरवा कंंदील दाखवला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये मात्र 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.