Unlock 4 Guidelines: देशात 30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज राहणार बंंद, 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार 'ही' सुट
Students Representative image (PC - Wikimedia Commons)

Unlock 4 Guidelines By GOI: केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने आज अनलॉक 4 च्या बाबत मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या. या मध्ये केंद्र सरकारने मागील काही काळात सर्वाधिक विचारला गेलेल्या शाळा कॉलेज (School Colleges To Remain Closed)  पुन्हा सुरु होण्याबाबतच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. गृह मंंत्रालयातुन देण्यात आलेल्या परिपत्रकात म्हंटल्यानुसार, केंद्र सरकारने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांंचे विचार लक्षात घेउन सप्टेंबर च्या शेवट पर्यंत शाळा कॉलेज बंंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात ऑनलाईन डिस्टंस लर्निंगला (Online Learning) प्रोत्साहन द्यावे आणि तसेच वर्ग घेणे सुरु ठेवावे असेही सुचित करण्यात आले आहे. याशिवाय इयत्ता 9 ते 12 च्या विद्यार्थ्यांना केवळ (Containment Zone वगळता) त्यांच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्याकरिता त्यांच्या शाळांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. यासाठी पालकांची लेखी संमती आवश्यक असेल असेही सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या अनलॉक 4 च्या मार्गदर्शक सूचना इथे सविस्तर वाचा 

दुसरीकडे, 21 सप्टेंबर पासुन शाळा व कॉलेज आपल्या शिक्षक व शिक्षकेतर स्टाफला 50 % उपस्थितीसहित ऑफिस मध्ये बोलावु शकतील, यावेळी सोशल डिस्टंंसिंग फॉलो करत ऑनलाईन वर्ग घेण्यापासुन ते काउंसिलिंग पर्यंतची कामे करता येतील असे केंद्र सरकर तर्फे सांंगण्यात आले आहे.

ANI ट्विट

अनलॉक 4 नुसार, देशात मेट्रो रेल्वे सेवा, (Containment Zone वगळता) सुरु करण्यास सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा,मनोरंजन, शैक्षणिक कार्यक्रम 100 माणसांच्या उपस्थितीत करण्याला सुद्धा केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. दरम्यान कंंटेनमेंट झोन मध्ये मात्र 30 सप्टेंबर पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे.