Coronavirus (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Update In Maharashtra: देशाच्या तुलनेत अधिक वेगाने कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात वाढत आहे, काल सुद्धा महाराष्ट्रातील मुंबई, पुणे या प्रमुख शहरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढला ज्यामुळे सद्य घडीला राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ही 24,427  झाली आहे. काल, 12 मे रोजी संपूर्ण दिवसात राज्यात नव्या 1,026 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली. तर 399 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतले आहेत.आजपर्यंत एकूण 5,125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधित 921 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याबाबत महाराष्ट्र आरोग्य  मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी यावर शिक्कामोर्तब केला आहे. महाराष्ट्रात मुख्य शहरांसह सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण किती कोरोनाग्रस्त आहेत याची नेमकी आकडेवारी आपण आता पाहणार आहोत.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत, त्यापाठोपाठ पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर या जिल्ह्यात कोरोनग्रस्तांची संख्या अधिक असल्याचे समजतेय. हे जिल्हे रेड झोन मध्ये आहेत. तर कोरोनमुक्त असणारे परभणी, बुलढाणा, गडचिरोली हे जिल्हे ग्रीन झोन मध्ये आहेत. कोकण भाग कोरोनाचे कमी रुग्ण असल्याने अंशतः ऑरेंज पट्ट्यात गणला जात आहे. याशिवाय तुम्ही राहत असणारा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 14, 924 556
2 ठाणे 140 3
3 ठाणे मनपा 1004 11
4 नवी मुंबई मनपा 955 4
5 कल्याण डोंबिवली मनपा 384 3
6 उल्हासनगर मनपा 53 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 35 2
8 मीरा भाईंदर 243 2
9 पालघर 38 2
10 वसई विरार मनपा 263 10
11 रायगड 129 2
12 पनवेल मनपा 146 8
ठाणे मंडळ एकूण 18,337 603
1 नाशिक 82 0
2 नाशिक मनपा 43 0
3 मालेगाव मनपा 616 34
4 अहमदनगर 54 3
5 अहमदनगर मनपा 10 0
6 धुळे 9 3
7 धुळे मनपा 54 3
8 जळगाव 152 15
9 जळगाव मनपा 40 9
10 नंदुरबार 22 2
नाशिक मंडळ एकूण 1082 69
1 पुणे 167 5
2 पुणे मनपा 2621 155
3 पिंप्री-चिंचवड मनपा 149 4
4 सोलापूर 9 0
5 सोलापूर मनपा 308 19
6 सातारा 123 2
पुणे मंडळ एकुण 3377 185
1 कोल्हापूर 13 1
2 कोल्हापूर मनपा 6 0
3 सांगली 34 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 4 1
5 सिंधुदुर्ग 6 0
6 रत्नागिरी 55 2
कोल्हापूर मंडळ एकुण 118 4
1 औरंगाबाद 94 0
2 औरंगाबाद मनपा 559 15
3 जालना 16 0
4 हिंगोली 61 0
5 परभणी 1 1
6 परभणी मनपा 1 0
औरंगाबाद मंडळ एकूण 732 16
1 लातूर 26 1
2 लातूर मनपा 5 0
3 उस्मानाबाद 4 0
4 बीड 1 0
5 नांदेड 4 0
6 नांदेड मनपा 42 4
लातूर मंडळ एकूण 82
1 अकोला 18 1
2 अकोला मनपा 151 11
3 अमरावती 5 2
4 अमवरावती मनपा 84 11
5 यवतमाळ 98 0
6 बुलढाणा 25 1
7 वाशीम 2 0
अकोला मंडळ एकूण 383 26
1 नागपूर 2 0
2 नागपूर मनपा 257 2
3 वर्धा 1 1
4 भंडारा 1 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 1 0
7 चंद्रपूर मनपा 3 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 275 3
1 इतर राज्य 41 10
एकूण 24,427   921 

दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन 4.0 ची घोषणा केली आहे, यामध्ये आधीपेक्षा काही नियम शिथिल केले जातील असाही इशारा देण्यात आला होता, ज्यांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉक डाऊन शिथिल केले तरी जिल्ह्याच्या सीमा इतक्यात उघडणार नाहीत असे स्पष्ट आदेश दिले आहेत.