Coronavirus: कोरोना व्हायरस संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यावर अवकाळी पावसाची कुऱ्हाड
Unseasonal Rains & Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Farmers Trouble In Maharashtra: राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal Rains) पडला आहे. तर, राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून, केव्हाही पर्जन्यवृष्टी होईल अशी स्थिती आहे. मंगळवारी (25 मार्च 2020) सायंकाळी आणि रात्री राज्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाची पर्जन्यवृष्टी झाली. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे आगोदरच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे अधिकच नुकसान झाले. कोरोना व्हायरसमुळे भाजिपाला, फळं आदींची वाहतूक आणि निर्यात यांवर परिणाम झाला आहे. त्यातच आता अवकाळी पाऊस पडल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची स्थिती आहे.

बंगालच्या उपसागरावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा, विदर्भापासून तमिळनाडूपर्यंत असलेली खंडित वाऱ्यांची स्थिती, यामुळे राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. अनेक भागांत जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गारपीट होण्याचा इशारा आहे. तर विदर्भातही मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तापमानाचा पारा वाढल्याने बहुतांश ठिकाणी उकाडा वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणावर बाष्पाचा पुरवठा होत आहे. तर, विदर्भ ते तामिळनाडू दरम्यन खंडित वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात वादळी पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर काही भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गारपीट होण्याचा धोकाही व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा, Coronavrius: कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रात 'हेल्पलाईन नंबर' ची घोषणा)

पुढचे तीन दिवस महत्त्वाचे आहेत. वातावरणातील बदलामुळे पुढच्या तीन दिसांमध्ये मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही गारपीट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी तापमानात वाढ होऊन कडक उन पडण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.