Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: twitter)

Coronavrius: कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडून महाराष्ट्रात हेल्पलाईन नंबरची (Helpline Number) सुविधा सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरा फेसबुक लाईव्हद्वारे घोषणा केली आहे. संकट गंभीर आहे, त्यामुळे काळजी घ्या, असंही त्यांनी म्हटलं आहे. कोरोना व्हायरस संदर्भातील शंकांचं निरसन करण्यासाठी ठाकरे यांनी +91 2026127394 या व्हॉटस्अॅप चॅटबॉट नंबरची घोषणा केली आहे.

या नंबरवर संपर्क करून किंवा चॅट करून नागरिक आपल्या शंका विचारू शकता. या व्हॉटस्अॅप ग्रुपवर नागरिकांच्या शंकाचं निरसन केलं जाणार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Total Lockdown in India: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवस लॉकडाऊन, 'या' सुविधा राहणार सुरू; जाणून घ्या संपूर्ण यादी)

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्यरात्री 12 वाजल्यापासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून संदेश दिला. यावेळी त्यांनी मोदींशी संपर्क केल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन दरम्यान कोणत्या जीवनावश्यक सुविधा सुरू राहतील यासंदर्भातही माहिती दिली आहे. तसेच नागरिकांनी गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये, असं आवाहनही केलं आहे.