Total Lockdown in India: कोरोना व्हायरसने (Coronavirus) देशभरात थैमान घातले आहे. आतापर्यंत भारतात 536 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवस लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकलाऊन करणं आवश्यक असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जनतेच्या हितासाठी नाईलाजाने हा निर्णय घेण्यात येत असल्याचंही मोदींनी सांगितलं. या लॉकडाऊन दरम्यान, देशात कोणत्या सेवा सुरू राहणार आहेत यासंदर्भात गृह मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. या सेवांची संपूर्ण यादी आपण जाणून घेऊयात...(हेही वाचा - शरद पवार यांनी मुलगी सुप्रिया सुळे आणि नातील बुद्धीबळाच्या खेळात हरवलं; पहा व्हिडिओ ; 24 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
लॉकडाऊन दरम्यान 'या' सुविधा सुरू राहणार -
- दूध, भाजी, फळ,बेकरी मांस, मासे,अंडी विकणारी दुकानं, ते साठवणारी गोदामं आणि त्यांच्या दळणवळण सेवा
- बँका,एटीएम, इन्शुरन्स कंपन्या आणि वित्तसंस्था
- प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं
- आयटी, टेलिकॉम, मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर, पोस्ट, इंटरनेट आणि डेटा सेवा
- जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा आणि ने-आण करणाऱ्या संस्था
- शेतीच्या उत्पादनांची आयात व निर्यात करणाऱ्या संस्था
- अन्न,औषधं आणि किराण्याची डिलिव्हरी करणाऱ्या इ-कॉमर्स, ऑनलाईन डिलिव्हरी सेवा
प्राण्यांचे दवाखाने
Ministry of Home Affairs guidelines for the 21-day lockdown, list of essential services that will remain open. #CoronavirusLockdown pic.twitter.com/hwRgWEM88z
— ANI (@ANI) March 24, 2020
पेट्रोल पंप, घरगुती गॅस पुरवणाऱ्या संस्था, तेलकंपन्या, त्यांची गोदामं आणि दळणवळण व्यवस्था
वरील सेवा पुरवणाऱ्या संस्थांना मदत करणाऱ्या संस्था तसेच औषधं बनवणाऱ्या फार्मा कंपन्या, दुध, दुग्धजन्य पदार्थ बनवणारे युनिट्स,डाळ आणि तांदळावर प्रक्रिया करणारे युनिट्स, आणि जनावरांसाठी चारा बनवणाऱ्या संस्था चालू राहतील. सर्व सरकारी ऑफिसेस, दुकानं आणि संस्था कमीत-कमीत कर्मचाऱ्यांसह चालू राहतील. परंतु, या कर्मचाऱ्यांमध्ये कमीत-कमी 3 फुटांचे अंतर असावे.