Coronavrius: कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रात हेल्पलाईन नंबरची घोषणा; 24 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Mar 25, 2020 12:19 AM IST
कोरोना व्हायरस (Coronavirus). भारत आणि जगासाठी एक काळ बनून राहिला आहे. या काळाविरुद्ध लढण्यासाठी अवघे जग उभे ठाकले आहे. जवळपास जग ठप्प झाल्याचे चित्र आहे. जगभराती अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. भारतातही अनेक राज्ये लॉकडाऊन करण्यात आली आहेत. महाराष्ट्रही याला अपवाद नाही. एकूण भारताचा विचार करता महाराष्ट्रातच कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आजच्या लाईव्ह ब्लॉगमध्येही आपण कोरोना व्हायस संकटावर जगभरातील देशांनी केलेली उपायोजना आणि ताज्या घडामोडी यांबाबत जाणून घेणार आहोत.
कोरोना व्हायस बाधित महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या आता 89 इतकी झाली आहे. तर कोरोना व्हायसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 इतकी झाल्याचे सांगितले जात आहे. भारतातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण सख्या 471 वर पोहोचली आहे. तर देशातील मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांची संख्या 9 इतकी झाली आहे. कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी आता देशभरातील अनेक राज्यांत आणि शहरांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच काही शहरंही लॉकडाऊन करण्यात आली आहेत.
दरम्यान, कोरोना व्हायरस संकट नियंत्रित करण्यासाठी अवलंबलेल्या उपाययोजनांचा परिणाम देश आणि राज्यांतर्गत वाहतूक आणि दळणवळनावर पोहोचला आहे. सर्व खासगी आणि सरकारी वाहनांतून होणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्य सेवा इतकाच काय तो अपवाद. सर्व काही बंद असले तरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरु आहेत. असे असले तरी या सर्वांचा परिणाम म्हणून राज्यातील बहुतांश बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शहरांना होणारा भाजीपाला आणि इतर आवश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसबाबतच्या देशविदेशातील घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.