Vegetable, Fruit Market Closed Due To COVID-19 Pandemic | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा विळखा राज्यातील मुंबई, नवी मुंबई (Navi Mumbai) आणि ठाणे (Thane) आणि पुणे (Pune) जिल्ह्याला अधिक बसताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवरर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे, नवी मुंबई शहरात एपीएमसी (APMC Market) कांदा-बटाटा, भाजीपाला (Vegetable Market), फळ मार्केट (Fruit Market) 14 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हा निर्णय आजपासून (11 एप्रिल 2020) लागू असणार आहे. प्राप्त माहितीनुसार, हे मार्केट पुढील आदेश येईपर्यंत म्हणजेच अनिश्चित काळासाठी बंद असणार आहे. केवळ ठाणे, नवी मुंबईच नव्हे तर पुणे शहरातील मार्केट यार्ड हा परिसरही आजपासून पुढील सूचना येईपर्यंत बंद असणारा आहे. प्रशासनाने वारंवार सूचना करुनही नागरिकांकडून सोशल डिस्टंन्सीग पाळले जात नाही. वारंवार त्याचे उल्लंघन होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

ठाणे मंडई बंद

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील भाजी मंडई, भाजीपाला बाजार, फळ बाजार तसेच फळे व भाजीपाला दुकाने बंद राहणार आहे. ही दुकाने 14 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहतील असे या आदेशात म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: सोशल मीडिया व मेसेजिंग अ‍ॅप्सवर Fake Messages पाठवल्यास 'अ‍ॅडमीन' विरुद्ध होणार कठोर कारवाई; मुंबई पोलिसांनी दिला इशारा)

पुण्यातही मार्केट बंद

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही भाजीपाला मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील मार्केट यार्ड आणि इतर ठिकाणी असलेली भाजीपाला, फळ, कांदा-बटाटा आणि केळी बाजार बंद करणयात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही दुकाने आणि बाजार बंद राहतील.

ट्विट

कोरना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने संबंध देशभरात लॉकडाऊन लागू केले होते. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने जीवनावश्यक वस्तू, सेवा देणारी दुकानं सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अपेक्षीत होते की, नागरिक स्वत:हून सरकारने दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करतील. पण, तसे घडले नाही. लोकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांवर झुंबड करायला सुरुवात केली. परिणामी कोरोना व्हायरस संसर्ग अधिकाधिक लोकांना होऊन हे संकट वाढण्याचा धोका निर्माण झाला.