Promoted Covid 19: सडक्या विचाराचे 'विषाणू' कृषी विद्यापीठाच्या डोक्यात शिरलेच कसे? शिवसेनेचा संतप्त सवाल
Promoted Covid 19 | (Photo Credit: Viral Image/Social Media)

कृषी विद्यापीठ (Krishi Vidyapeeth) पदवीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर 'प्रमोटेड कोविड 19' (Promoted Covid 19) असा उल्लेख करण्याचा प्रताप महाराष्ट्रातील एका कृषी विद्यापीठाने केला. त्याची तातडीने दखल घेत असा कोणताही उल्लेख गुणत्रिकांवर असणार नाही असा लागलीच खुलासा कृषीमंत्री दादा भुसे ((Agriculture Minister Dada Bhuse)) यांनी केलाही. दरम्यान, विद्यापीठाच्या याच प्रतापावर संताप व्यक्त करत 'सडक्या विचारांचे 'विषाणू' कृषी विद्यापीठाच्या डोक्यात शिरलेच कसे?', असा संतप्त सवाल शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना (Saamana Editorial) संपादकीयातून करण्यात आला आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'कोविड प्रमोटेड' असा शिक्का मारण्याचा विचार ही विकृतीच म्हणावी लागेल, असेही म्हटले आहे.

'नुसते उपद्व्याप थांबवा' या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकीयात प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे की, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर 'कोविड प्रमोटेड' असा उल्लेख करण्याबाबतचा 'विषाणू' कृषी विद्यापीठाच्या डोक्यात सोडणारे कोणी भलेतच आहेत? विद्यार्थी हा कोणच्याही स्वार्थी राजकारणाचे साधन होऊ नये. मग ती पदवीची अंतिम परीक्षा असो किंवा कृषी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर 'प्रमोटेड कोविड-19' असा शिक्का मारण्याचा विचारा. चांगले काही करता येत नसेल तर वाईट तरी करु नका. हे नसते उपद्व्याप थांबवा, असेही शिवसेनेने म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: कृषी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'Promoted (COVID-19)' असा उल्लेख, मंत्री दादा भुसे यांच्याकडून स्पष्टीकरण )

कोरोना प्रामाणेच महाराष्ट्रातील काही प्रवृत्तींच्या मनात विकृतीचे विषाणू थैमान घालत आहेत. पदवीच्या अंतिम परीक्षांबाबतही असाच विनाकारण घोळ घातला जाता आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल. म्हणून राज्य सरकारने विद्यार्थीहिताची भूमिका घेतली. मात्र, त्यातही राजकारण खेळलेच जात आहे. वरकरणी यूजीसीचे आदेश असले तरी पडद्याआडचे त्यामागचे सूत्रधार वेगळे आहेत. हे विद्यार्थी आणि पालकांनाही माहिती आहे. अर्थात राज्य सरकार आजही पदवीची अंतिम परीक्षा न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे आणि तेच योग् आहे. तरीही अंतिम परीक्षा घेण्याचे शेपूट वळवळतच आहे. असेच एखादे शेपूट कृषी विद्यापीठांध्येही वळवळले का? या शेपटाने कृषी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ''प्रमोटेड कोविड 19' असा शिका मारण्याचा प्रयत्न केला का? असा सवालही शिवसेना मुखपत्रातून विचारण्यात आला आहे.